भाजप कार्यकर्त्यांचा कांग्रेस पक्षामध्ये प्रवेश
Jalna Nayak 04-Aug-2026
Total Views |

जालनाः अखिल भारतीय कॉग्रेस पक्षाचे खा.कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जनसंपर्क कार्यालयात जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वात व कांग्रेसचे अंबड तालुका अध्यक्ष कल्याण तार्डे यांच्या उपस्थितीत अंबड तालुक्यातील सचिन पवार, अविनाश चव्हाण, अनिल चव्हाण, अमोल राठोड, सचिन राठोड, रोशन राठोड, शांतीलाल चव्हाण, सुरेश चव्हाण, विकास चव्हाण इ.बहुसंख्य भाजप कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय कॉग्रेस पक्षात प्रवेश केला . या वेळी जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने त्यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले.या प्रसंगी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष बदर चाऊस, जिल्हा सरचिटणीस शांतीलाल बनसोडे, राजाभाऊ कुलकर्णी रऊफ परसुवाले सुनील चौधरी, प्रदेश कमीटीचे सरचिटणीस ॲड. राम कुऱ्हाडे, किसान कांग्रेसचे भागवत घाटे, जालना तालुकाध्यक्ष कृष्णा पडुळ, घनसावंगी तालुकाध्यक्ष श्रीरंग कामटे, ओबीसी कांग्रेस अंबड तालुका अध्यक्ष दिलीप चव्हाण, कांग्रेस ओबीसी सेलचे जालना जिल्हा प्रभारी श्यामराव राठोड, मागासवर्गीय सेलचे अंबड तालुका अध्यक्ष भागीनाथ घुले, शेख वसीम, यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थीत होते.