भास्कर दानवे यांचा चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार

Jalna Nayak    04-Aug-2026
Total Views |

danve

जालनाः जालना शहरातील संत शिरोमणी श्री रविदास महाराज स्मारकाचा प्रश्न मनपा च्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केल्याबद्दल भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांचा चर्मकार समाजाच्या वतीने सोमवारी चित्रकूट निवासस्थानी शाल व हार देऊन सत्कार करण्यात आला.

जालना शहरातील बालाजी चौक येथे संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या नावाने शहरात जागा उपलब्ध करून भव्य स्मारक उभारण्यात यावे, तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी चर्मकार समाजाने उपोषण केले होते. त्यावेळी भास्कर दानवे यांनी आंदोलनस्थळी भेट देत समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी अशोक भगुरे, योगेश बिल्लोरे, सचिन इरछे, दिनेश लामकाने, बंसीदास भगुरे, चंपालाल शिवलाल, सुकलाल गहेराव, रवी धामणे, दादाराव बोरकर, हिरालाल पिंपळे, देवीलाल बिरसोने, बन्सीलाल ढवळे, शिवलाल वडोदे, मनीष धामणे, गणेश पिंपळे, शंकर पसरटे, अशोक जोहरे, संतोष डोंगरे, राजेश वडोदे, श्रावण परमेश्वरी, किशोर पिंपराळे आदींची उपस्थिती होती.